राज्य गमावलेला एक राजा, आपल्याच माणसांनी घराबाहेर काढलेला एक व्यापारी — दोघे वनात भेटले.राजा सुरथ आणि वैश्य समाधी मेधा ऋषींकडे आले. एकच दुःख: फसवणाऱ्यांमध्येच मन का अडकतं?ऋषी म्हणाले: ही महामायेची माया. मग तीन कथा — मधु-कैटभ, महिषासुर, शुंभ-निशुंभ. हीच सप्तशती.दोघांनी नदीकाठी मातीची देवी करून तीन वर्षं पूजली. देवी प्रकटली — राजाला राज्य, वैश्याला ज्ञान.